10+ बाबा वर कविता[2024] Marathi Poems on Father

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत Marathi Poems on Father ज्या तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही या कविता Fathers day साठी पण वपरू शकता या कविता तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता किंवा Instagram च्या पोस्ट च्या बायो ला caption म्हणून पण वापरू शकता तर चला मग पाहू या….187+ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

Marathi Poems on Father

माझे बाबा

बापलेकीची परमेश्वराने
हि घडवलेली भेट आहे
माझे बाबा खरोखरच
हिरो पेक्षा हि ग्रेट आहे ..

मुलीला जिवापाड कसे
जपायचं तुम्हांला समजलं पण,
मला मात्र असे
कधीच नाही उमजलं ..

मला कशाची राहली
नाही कधीच आस
वारंवार हट्ट करून
दिला फारच मी त्रास..

बाबांनी माझ्या आयुष्यात
भरपुर असे काही केले
आणि त्यांच्याच समवेत
आयुष्यच उलघडत गेले..

झालेल्या चुकां बद्दल
मला क्षमा हि असावी
तिरस्काराला मात्र हृदयात
कुठेच जागा नसावी ..

बाप ❣🙏
“सावली देऊन लेकरांस स्वतः ऊन्हामध्ये राबतो.
आयुष्यभर लेकरांसाठी धडपडत असतो.‌
सोन व्हावं जीवनाचं त्यांच्या म्हणून तळमळ करतं असतो.
स्वतःसाठी जगण्याचं ही भान त्यांना नसते.
कठोर मन असतं त्यांचं पण लेक सासरी जातांना हंबरडा फोडतो.
लेकीसाठी बापाचं मन हळवं होतं.
आजवर होती आमची आता झाली तुमची
म्हणून लेकीचा हात जावया कडे देतांना हृदय त्यांच भरुन येते.
घळाघळा अश्रू धारा डोळ्यातून वाहते.
आयुष्यभर गरजांची पूर्तता करणारा बापच एकमेव असतो.
आपण कधीच नाही समजू शकणार एवढं बापाचं मन मोठं असते….

बाबा❤️

बाबा बाबाच असतो कधी
ही न डगमगनारा
माणुस त्या क्षणी तो हळवा होतो
ज्या क्षणी तो त्याच्या बाळाला
पहिल्यांदा हातात घेतो.

बाबा बाबाच असतो
दुख:त ही न रडणारा माणुस
हळूच आनंद आश्रु पुसतो
जेव्हां तो बाबा होत
आई बाळाला नऊ

महिने सांभाळते त्याला ती
पोटात वाढवते बाबा बाळाच्या
भविष्याचा विचार करतो त्याला
तो डोक्यात वाढवतो
बाबा बाबाच असतो

माझ्या चुकांचा त्रास माझ्या
बाळाला होवू नये हाच सतत
प्रयत्न करतो वेळे प्रसंगी ओरडतो
मारतो मी केलेली चूक मुलानी
करु नये या साठी कळजी घेतो

आई मुलाला स्वत:ची वीस
वर्षे देते बाबा मुलगा सेटल
होई पर्यंत साथ देतो
बाबा बाबाच असतो

मुली बाबांन साठी परी असतात
पण मुल ही राजकुमारा दोघांन
वर तो समान पण फक्त
मुली समोरच व्यक्त होतो
पेक्षा कमी नसतात प्रेम करतो

ते फक्त मूलाला तो
स्वत: वडिल झाल्यावरच
समजत की दोन्ही मुलांनवर
बाबा समान प्रेम करतो.
बाबा बाबाच असतो स्वत:
झिजु मुलांच्या आयुष्यात
सुगंध पसरवतो.

-चेतना मिरकूटे

पिता……
सूर्यप्रमाणे तळपालणाऱ्या जिवाच्या वाटेवर
मायेची सावली तुम्ही जीवनातील दुःखरुपी….
युद्ध व माझ्यातील…… ढाल बनता तुम्ही……..
`वडील ´ असतो वाडासारख्या मातीत घट्ट
रुतून कुटुंबाला सावली देणारा तो बाप असतो
स्वतः ऊन सोसवणारा पण लेकरांच्या पंखात बळ देणारा
कुटूंबाचे छत्र होऊनी मायेची सावली
दारणारा माझ्या जगण्याला अर्थ आहे
तो केवळ तुमच्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य केवळ
तुमच्या सेवेत सुचलं तर खूप काही आहे
पण देवाबद्दल लिहावे शब्द अस्तित्वात नाहीत
एवढे बाबा जरी सांगता येत नसलं
तरी तुम्हीच आहात माझे सर्वस्व माझे बाबा आहेत
प्रेमाचं एक अतूट झरा प्रेमाने जवळ ही घेतेत माझे बाबा आहेत
एक सावली देव म्हणावे तरी कसे तुम्हला
तुम्ही तर त्याहुनी श्रेष्ठ माझ्यासाठी देव देतो
सुख दुःख दोन्ही पण तुम्ही सुखाने भरले आयुष्य
माझे तुम्ही पूर्व जन्माची पुण्याई माझी लाभले
पिता म्हणुनी तुम्ही हीच धन्यता माझी……….
🙏 स्वरचित कविता : आरती संभारम

Baba❤️

बाबा आपने हर वक्त जिया
हमारे लिए, बचपन की कहां
मुझे ज्यादा बाते याद हैं,
मगर आपके साथ

आपके हाथ पकड़ के चलना,
मानो ये कल ही की तो बात है…
बाबा वो कल की बात है,
क्या वो हमेशा होगा….

मुझे आपके पास सोना,
आपकी गोदी में खेलना,
आपकी मूंछों से शरारत करना,
क्या वो हमेशा होगा,

आपकी ये लाडो हमेशा
आपके पास होगी ना,
बाबा ये रास्ते चल तो लूंगी मगर,
इन मुश्किलों में आपका साथ होगा ना,

बाबा आपका हाथ हमेशा मेरे हाथो में होगा ना….
बाबा मुझे कहां कुछ ठीक से याद है,
मगर मेरा बीमार होने पर,
आपका मेरे साथ होना..

बाबा आप हमेशा मेरे पास हो ना…
बाबा मेरे खुश होने पर खुश होना,
मेरी शरारतों पर यूं प्यार भरा डाट लगाना,
मैं ख्याल रख सकती हूं बाबा,

पर आपकी नजरों ने कभी बड़ा होने ना दिया,
बाबा मैं हमेशा आपकी छोटी लाडो ही रहूंगी ना….
बाबा, इन शब्दों में कैसे कहूं, आपका प्यार,
इन पन्नो में कैसे बया करूं, मेरी दुनिया
आपके बिना हमेशा अधूरी है बाबा…

Love You Baba❤️
@मोहित_साहू

बाप

घराबाहेरची जीर्ण चप्पल,
पिकलेली खुरटी दाढी,
रखरखीत हात,
डोळ्यांखालची काळी वर्तुळं
हे सगळं जरी वयोवृध्द होतं
असलं तरी त्याचा ‘कणा’
मात्र आपल्यासाठी आणखी
कणखर होत जातो.
‘बाप’ म्हणजे आणखी वेगळं काय ….

बापाचा धाक
आपल्या होणाऱ्या प्रगतीत
थोडासं लक्षपूर्वक बघितल
तरं बापाचा धाक असतो
म्हणून तर यशाचा
झेंडा फडकत असतो.

-प्रसाद

त्यांचं मुलांवर असलेलं प्रेम
कधीच शब्दात व्यक्त करत नसतात
ते त्यांच्या कृतीतून दिसतं
फक्त आपल्याला ओळखता यायला हवं

🌸🌸🌸🌸

बाप स्वाभिमानी बाणा,
बाप कणखर कणा
त्याच्या काळजात सुद्धा
लाजालुची संवेदना त्याची
पहाडाची छाती,

त्याचे हृदय गुलाब त्याच्या
घामाच्या थेंबांना हियी मोत्याचा
रुबाब बाप तलवार ढाल,
बाप पेटती मशाल बाप जागतो
म्हणून घर झोपते खुशाल

बाप घराचा तो पाया
आई कळस त्यावरी
जेव्हा खचतो ना पाया
तेव्हा कोसळते घर
उलाढाली करतो

हा बाप फक्त घरासाठी
शिव्या शाप या जगाचे
बाप घेतो सारे माथी
घर बायकोनी मुले यांना
जगवण्यासाठी बाप होतो

वेडापीसा एका एका पैशासाठी
बाप म्हणजे कसा जसा
पाण्यातला मासा त्याच्या
डोळ्यातला थेंब कोणा दिसणार
कसा बाप साठवतो आश्रू वाट पाही

त्या क्षणांची जन्म भराचे रडतो
लेक जाताना सासरी ज्याने जपले
मुलांना तळहाती पाकल्यात अशा
बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात
बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार नाही
उपयोग पुन्हा किती घातले पित….!

बाप राबतो जीवाचं रान
करून लेकरांच्या सुखासाठी,
त्याच्या कष्टाचं मोजमाप कोणत्याच
तराजूत करता येत नाही….

जन्मभर डोळ्यांच्या किनाऱ्यावरून
परतणारी आसवे, लेक सासरी जाताना
आपली हौस पुरी करतात…
काला त्याची चप्पल यायला लागली
की त्याचा मित्र बनतो,

बाप नावाची जबाबदारी नकळत
त्याला शिकवायला लागतो….
आधार शब्दापेक्षा जास्त आधार
‘बाप’ या शब्दात वाटतो….
@SHRUती

मला खरच तुमच्यासारख व्हायचं आहे . तुमचं बोलणं, वागणं प्रत्येक गोष्ट येवढं नीट समजावून घेता आणि सांगता पण काय करणार, आम्ही त्या ऐकत नाही हो हे चुकत माझं पण तुम्ही माझे खरे मित्र आहात म्हणजे ज्यावेळी मी hostel ला तुमच्यासोबत जात होतो येत होतो तेव्हा अस वाटायचं की काय गरज आहे या माणसाला माझ येवढी काळजी करायची. कधी कधी तर पूर्ण प्रवास तुम्ही माझ्यासाठी उभ राहून केलात ना…… खर सांगू येवढं कोण करत का ओ?

तुम्ही आजारी असल्यावर मला ही वाईट वाटत पण तुम्ही तुमचा आजार कधी आम्हाला सांगत नाही. माझं माझ्या आई वर ना खूप प्रेम आहे कदाचित तिच्या इतकं प्रेम मी कधीच कोणावर नाही करू शकत. पण तिच्याहून जास्त काळजी आणि आदर मी तुमचा करतो. जरी बोलत नसलो दाखवत नसलो तरी.

खर तर या व्यक्तीला किंवा या नात्याला कोणी लेखक किंवा मुलगा पत्रात मांडू शकत नाही कारण खरच काय काय लिहावं या व्यक्ती बदल, तरी खूप कमी वाचायला आणि पाहायला मिळतं आहे या व्यक्ती बदल..

मी फक्त प्रयत्न करतो आहे जर चुकल ना तर माफ करा हा बाबा हा म्हणजे तुम्हाला माहित आहे मला हे सगळ अगदी चांगल जमत तरी आज थोडा कापतोय कारण माहित नाही. तुम्हाला पत्र लिहायचं कारण एकच की बाबा तुम्हाला नेहमी वाटत की मी फक्त आईची काळजी घेतो माझं सर्वात जास्त प्रेम माझ्या आईवर आहे. हा आहे पण तुमच्यावर खूप आहे मला कधी ते व्यक्त नाही करता आल पण आहे आता मी आईला सांगितलेली secrets तुम्हाला नाही सांगत कारण नाही माहित. त्या हिंदी सिनेमामध्ये किंवा मराठी सिनेमामध्ये दाखवतात तसे तर तुम्ही आजिबात नाही. तरी एक भिंती आहे त्याच कारण तुम्हाला माहित असेल तर मला ही सांगा .

अधिक वाचा: शिवजयंती अप्रतिम शुभेच्छा संदेश

बाबा यार एकदा मिट्ठी मारुयात का? मला नाही वाटत की माझ्या बाबांना कोणी माझ्या नावावरून ओळखावं मला माझ्या बाबांच्या नावानेच सगळ्यांनी नेहमी लक्ष्यात ठेवावं तुम्ही जसे आहात तसे अगदी एका देवा सारखे आणि आजच्या काळातल्या superhero सारखे आहात आणि तुम्ही माझे आदर्श आहात. Thank you आणि sorry येथे नाही उपयोगी पडणार….. बाबा। love you’

मित्रांनो वरील कविता कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि तसेच तुम्ही पण आम्हाला तुमच्या कविता पाठऊ शकता. आम्ही या सर्व कविता instagram वरुण शोधून इथे पुरवल्या आहेत जर तुम्हाला यातील तुमची कविता हटवायची असेल तरी तुम्ही आम्हाला ईमेल द्वारे कळऊ शकता. आम्ही अश्याच काही कविता लिहल्या आहेत त्या कविता तुम्ही इथे पाहू शकता.

Best 100+ Poems For Girlfriend In Marathi 2024View Here
आई विषयी काही कविता | आई वर चारोळी & आई विषयी शायरी 2024View Here
आजोबा आणि नात कविता | Grandfather and Granddaughter Poem In MarathiView Here
Best Marathi Poems On Nature 2024View Here
Best 100+ Beautiful Quotes On Life 2024View Here
Poems on tree in Hindi | पर कविता हिन्दी 2024View Here

2 thoughts on “10+ बाबा वर कविता[2024] Marathi Poems on Father”

Leave a Comment