200+ आई वर सुंदर चारोळ्या | कविता & शायरी 2024 | Poems On Mother in Marathi |

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत आई साठी काही खास अश्या कविता किंवा चारोळी आणि तसेच काही शायरी संदेश जे तुम्हाला आणि तुमच्या आई ला नक्की आवडेल. aai sathi kavita ज्या की तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता जर Aai cha Birthday असेल तरी देखील तुम्ही तिला यातील कोणती पण कविता सेंड करू शकता आणि जर तुम्हाला आई बरोबरचा फोटो स्टेटस वर टाकून खाली caption ला आई साठी च्या कविता टाकायच्या असतील तर टाकू शकता.

poems on mother

आम्ही Aai sathi short poems देखील दिल्या आहेत ज्या की तुम्ही सहज तुमच्या instagram च्या पोस्ट साठी च्या captionला ठेऊ शकता जर तुम्ही गूगल वर instagram caption for mother अस जर सर्च केल तरी देखील तुम्ही आमच्या साइट वरील कविता पाहू शकता. तसेच तुम्ही जर आईला greeting card किंवा [Birthday Gift Card ] वाढदिवसाचे गिफ्ट कार्ड या वर जर कविता लिहून तिला आनंद द्यायचा असेल तर तुम्ही इथली एखादी कविता वापरू शकता.

Short poem on mother in Marathi

इथे आम्ही वरती दिल्या प्रमाणे शॉर्ट कविता दिल्या आहेत ज्या की तुम्ही caption किंवा Instagram story म्हणून पण ठेऊ शकता. विशेष म्हणजे तुम्ही mother’s day ला Mother’s day kavita म्हणून देखील कविता टाकू शकता आणि आणि सगळ्यांना तुमच्या स्टेटस टाकून वट जमऊ शकता.

 माय असे उन्हातील सावली
माय असे पावसातील छत्री 🙏
माय असे थंडीतील शाल
यावीत आता दु:खे खुशाल ❣

ही चार ओळीची कविता आईची महानता दर्शवते आणि आई ची माया नक्की काय असते हे दर्शवते. लेखक आईला उन्हातिल सावली, पावसातील छत्री आणि थंडीतील शाल अशी उपमा देतात. या कवितेचे लेखकाचे नाव अद्याप आम्हाला सापडल नाही जर ही कवितेचे लेखक माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा.

वात्सल्याची होते बरसात
आई तुझा हात
उन्हात आभाळाची छाया
आई तुझी माया
साठलेला गोड मध
आई तुझे शब्द
पोथी ग्रंथाची खाण
आई तुझे ज्ञान
जिथे विश्व सारे येते
आई तुझे गाणे
मिळे प्रेम आणि शांती
आई तुझी मूर्ती

या कवितेत लेखक आईचे वेगवेगळे गुण उपमा देऊन सांगतात जसे की आईची माया जिला आभाळा ची उपमा दिली आहे असेच लेखकांनी वेगवेगळे उदाहरणे दिली आहेत.या कवितेचे लेखक देखील आम्हाला सापडले नाहीत. कोणाला माहीत असेल तर नक्की कळवा.

 काय लिहू मी आईसाठी
कसे लिहू मी आईसाठी
पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे
आईसाठी लिहीण्याइतपत
माझे व्यक्तिमत्व नाही मोठे 

या कवितेत लेखकाला आई बद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडत आहेत आणि तेच व्यक्त करताना कवि हे लेख लिहत आहे. याचे लेखक सध्या आम्हाला अवगत नाहीत.

 खिशातल्या हजार मूल्य सुद्धा 👪
बालपणी आईने खाऊ खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते

लेखक आपल्या लहान पणीच्या आठवणी सांगत आहे तो म्हणत आहे की लहान पणी जेव्हा आई खाऊ साठी जो रुपया दयची त्या रुपयाची किंमत आत्ता खिशात असेलेल्या हजारो रुपयांपेक्षा जास्त आहे. या कवितेचे लेखक सध्या आम्हाला अवगत नाहीत.

सहन करताना वेदना
मुखातून एक शब्द सदा येई 🙏
प्रेमाचा पाझर पसरवून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ❣

💝💝💝

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा
अमृत होईल,आई नसेल सोबतीला
तर सावलीत सुद्धा चटके देईल

🌸🌸🌸

आई जितकी प्रेमळ
असते
आणि तितकीच कणखर
दिसते भर उन्हात ती
आपल्याला गारवा देणारी
सावली असते.

🌺🌺🌺

आई म्हणजे..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी

🌸🌸🌸

जीवनातील पहिली शिक्षक
आणि मैत्रीण आई असते
आपलं जीवन पण आईच कारण
आपल्याला जीवन देणारी आईच असते

🌱🌱🌱

Long Poems On Mother In Marathi

मित्रांनो आता आई साठी च्या शॉर्ट कविता आता खूप झाल्या आता आपण बघू काही लांब लचक अश्या कविता. ते काय असत काही काही वेळेस छोट्या कविता वाचून काही मन भरत नाही म्हणून आता आपण बगु मोट्या कविता.

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.

 जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।
असे ऋण हे की जया व्याज नाही।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।
जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।
जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।
जिने लाविला लेकरांना लळा या।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।
जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई।।

आई बद्दल कविता संग्रह😇

आई बद्दल जेवढं लिहावं तेवढं कमीच असते. आई म्हणजे जीव की प्राण असेत. 
आज मी आपणास आई बद्दल च्या भावनांना चारोळी , कविता मध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे.

आईला तिच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश. 

आई कविता

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे..

आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल…

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…
.. – ADITYA SHAM ZINAGE

जोरात ओरडल्यावर जी क्षणात कवेत घेते,
ती फक्त आणि
फक्त आपली आई
असते.

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा
अमृत होईल,आई नसेल सोबतीला
तर सावलीत सुद्धा चटके देईल

आई जितकी प्रेमळ
असते
आणि तितकीच कणखर
दिसते भर उन्हात ती
आपल्याला गारवा देणारी
सावली असते.

आई खूप प्रेमळअसते
मन तीचं फार निर्मळ असते
आनंद सारा देऊन आपल्याला
दुःख आपलं घेऊन जाते.

आई म्हणजे..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai chi kavita marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मुंबईत घाई

शिर्डीत साई, फुलात जाई

गल्लीगल्लीत भाई

पण जगात भारी 

केवळ आपली आई!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai marathi kavita charoli

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझ्याविना घर हे
आता सुनं पडलंय,
तू गेल्यावर मन माझं
आता परकं झालंय.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जीवनातील पहिली शिक्षक
आणि मैत्रीण आई असते
आपलं जीवन पण आईच कारण
आपल्याला जीवन देणारी आईच असते

हे पण वाचा : आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई कविता लिहिलेल्या

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वतः जागी राहून

आम्हाला झोपवलं,

आम्हाला हसवण्यासाठी

स्वतःला रडवलं,

हे देवा दुःख कधीच नको देऊ तीला

जीला मी आई म्हटलं.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मायेन भरलेला

कळस म्हणजे आई,

मायेन विसावा देणारी

सावळी म्हणजे आई

-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

असेन जर मजला
मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी,
पुन्हा जन्मावेसे वाटते
-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai aathvan kavita

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मनातलं ओळखणारी
डोळ्यातलं वाचणारी
सुख असो वा दुःख
सर्वकाळ प्रेम करणारी
आई असते.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई वर कविता

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई जितकी प्रेमळ असते
आणि तितकीच कणखर दिसते
भर उन्हात ती आपल्याला
गारवा देणारी सावली असते.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई तुझ्या कुशीत,
पुन्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन,
दुर जावेसे वाटते..

-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai chi kavita marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई असते एक फुलाची कळी 
सतत उमलत राहून सतत सुगंध दरवळत ठेवणारी
आई असते क्षमेची मूर्ती, 
आपल्या मुलांचे अनेक अपराध पोटात घालणारी
आई असते एक सावली
सतत सोबत राहून मार्ग दाखवणारी
आई असते परोपकारी
स्वतःसाठी न जगता इतरांसाठीच जगत राहणारी

– प्रियांका पाटील 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai chya kavita marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील.

– Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

– Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

अतुलनीय तुझी माया, मनमोकळ्या
स्वभावाचा तू नमुना
बडबड आणि कटकटीतही दडलेल्या
असतात तुझ्या सद्भवना
तराजूत तू तोलत नाहीस
व्यक्ती वा त्यांच्या संवेदना
कणभरही ठेवत नाहीस कधीच
कुणाविषयी मनात घृणा
वर्षानुवर्ष निरोगी आयुष्य लाभू दे तुला
हीच आमुची ईश्वरचरणी प्रार्थना 

– वेद बर्वे, विरार

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai chya kavita

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोठेही न मागता भरभरून
मिळालेलं दान म्हणजे आई 
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ
वरदान म्हणजे आई 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई 

एकमेव स्त्री 
जी माझा चेहरा
बघायच्या आधीपासून
माझ्यावर प्रेम करते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रत्येक कलाकार आपण तयार
केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो
पण आईसारखी कलाकार
संपूर्ण जगात नाही
जी बाळाला स्वतः जन्म देऊनही
वडिलांचे नाव देते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य..

-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ती फ़क्त आईच..!
सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर …मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते
घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात
पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत
असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 जगी माऊली सारखे कोण आहे ।

जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।

असे ऋण हे की जया व्याज नाही।

ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।

जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।

तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।

जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।

तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।

जिने लाविला लेकरांना लळा या।

तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।

जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।

अशा देवतेचे जगी नाव आई।।

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai chi kavita marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 माझ्या जीवनाची सावली 

आई माझी माऊली

कष्ट करोनी अतोनात

भरवलास मज घास

केलीस माझ्यावर माया

जशी वृक्षाची छाया

जगण्यास मज दिशा तू दावली

माझ्या जीवनाची सावली 

आई माझी माऊली

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई वर कविता

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एकदा जरासं कुठे खरचटलो

आई, किती तू कळवळली होतीस

एक धपाटा घालून पाठीत

जख्मेवर फुंकर घातली होतीस

-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई आता कुशीची माती जरा मला दे

रक्तास पोसणारी नाती तर मला दे 

व्हिवळत्या दगडास मोठी उसंत दे गं

आपटू नको मला थोडे तरी जगू दे 

आई तुझ्याच उदरी येईन सदा मी गं

पण पोटात मजला यथार्थ वाढू दे

मुलगी म्हणून तुझी आली जरी मी इथे 

होऊन काठी हाताची आता मला फिरू दे

कित्येकदा पाजला तू काढा नकोनकोसा

पोटास दाबणाऱ्या काकुस तू सजा दे

माया पाझरणारी छाती तुझी मला दे

आई आता कुशीची माती जरा मला दे

– संतोष वाटपाडे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 आई माझी,

लेकराची वाट, आंधळ्याची काठी

छप्पराची ताटी, भाकरीची पाटी

आई माझी

गाडीचं इंधन, कपाळाचं गोंदण

अमृताचं ताम्हण, चाकाचं वंगण

आई माझी

मळ्याची माती, गणाची आरती

दिव्याची वाती, संताची संगती

आई माझी

गव्हाची कुडी, पिकाची सुडी

सज्जना झोपडी, चंदनाची छडी

आई माझी

शिवाची जिजाई, जिजाची शिवाई

लेखणीची शाई, जगाची आई 

आई माझी

– विठ्ठल जाधव, बीड

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 आई – हृदयाची हाक

आई – निःशब्द जाग

आई- गूढ अंतरीचे

आई – नाव परमात्म्याचे

आई – नसे केवळ काया

आई – ओंजळभर माया

आई – गगनभरारी

आई – पंढरीची वारी

आई – दुधाळ सावली

आई – आभाळ माऊली

आई – एक अक्षयगान

आई – कर्णाचे दान

सुमती वानखेडे 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai kavita in marathi lyrics

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,

जीवन हिच

नौका तर आई म्हणजे तीर,

जीवन हिच शाळा तर

आई म्हणजे पाटी,

जीवन हे कामच काम तर आई

म्हणजे सुट्टी….!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई……

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असते जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai kavita lyrics

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 आई माझी मायेचा सागर 

दिला तिने जीवना आकार 

आई वडिल माझे थोर 

काय सांगू त्यांचे उपकार 

जीवनाच्या वाटेवरती 

किती अस्तो त्यांचा उपकार 

आई माझी मायेचा सागर ..

तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात 

राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात 

कधी मिडेल मुठभर घास 

कधी घड़े तुला उपवास  

वोल्या मातीतून चालताना 

सोडविले कट्याचेभास 

आई माझी मायेचा सागर ..

रविची चांदनी तू ग चंदनाचा कोर

शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर 

तुझ्या शीतल छाये मधे 

उभा आयुष्य जगेल 

आई देवापाशी मी ग 

आई तुलाच ग मागेन 

आई माझी मायेचा सागर ..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई, तुझ्या रागवण्यातही

अनूभवलाय वेगळाच गोडवा

तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात

फिका पडतो दसरा नि पाडवा

Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर

जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर

जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी

जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai prem kavita marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 डोळे मिटुन प्रेम करते ती प्रेयसी,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती,

डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी,

आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Aai Kavita in Marathi short

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई साठी काय लिहू

आई साठी कसे लिहू

आई साठी पुरतील एवढे

शब्द नाहीत कोठे

आई वरती लिहीण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई ,तुझ्यापुढे ही

माझी व्यथा कशाला ?

जेव्हा तुझ्यामुळे ह्या

जन्मास अर्थ आला…

 -Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई तू उन्हामधली सावली

आई तू पावसातली छत्री

आई तू थंडीतली शाल

आता यावीत दु:खे खुशाल

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

aai kavita in marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई

ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई

अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई

अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई कविता संग्रह मराठी

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, ………….

दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन

जाता आली का ?

ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग

ह्याला कळेल….

बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत

तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत

यायची काय गरज होती…. ?

पण ……. आई

आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस,

माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू

नाही शकला का…..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई, तुझ्यापुढे मी

आहे अजून तान्हा

शब्दात सोड माझ्या

आता हळूच पान्हा…

-Smita Haldankar

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आई कविता मराठी,आई कविता संग्रह,आई कविता फ मु शिंदे,आई कविता यशवंत,आई कविता दाखवा,aai che kavita,i chi kavita,i kavita dakhva

(आई चारोळी, आई बद्दल कविता, आईवर चारोळी)

4 thoughts on “200+ आई वर सुंदर चारोळ्या | कविता & शायरी 2024 | Poems On Mother in Marathi |”

Leave a Comment