Best 100+ Poems For Girlfriend In Marathi 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण Poems For Girlfriend In Marathi पाहणार आहोत, तुम्हाला आणि तुमच्या प्रियसीला या प्रयसी वर मराठी कविता नक्की आवडतील. प्रियसी म्हणजेच जिला आपण English मध्ये Girlfriend म्हणतो तिला खुश ठेवण जितकच अवघड आहे तितकच सोपं आहे मुलींना खुश करन्यासाठी महागड्या गिफ्टच हव्यात अस नाही तुम्ही त्यांना अश्या छोट्या छोट्या कविता पण पाठऊ शकता किंवा बोलून दाखवू शकता. मला नक्की खात्री आहे की तुमची गर्लफ्रेंड नक्की खुश होईल.

तुम्ही या कविता तुमच्या प्रियसीला तिच्या वाढदिवसाला देखील कविता पाठवू शकता किंवा एखादे मस्त असे ग्रीटिंग कार्ड बनवून त्यावर या कविता लिहू शकता आम्ही ग्रीटिंग कार्ड साठी कविता देखील आम्ही दिल्या आहेत. तुम्ही त्या कविता थोडे बदल करून देखील ग्रीटिंग कार्ड वर लिहू शकता. तुम्ही या कविता poems for girlfriends birthday असे सर्च करून देखील मिळवू शकता. तुम्ही या कविता instagram वर देखील पाहू शकता आणि यांचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही आसन नही जिंदगी ही कविता पण वाचू शकता

Priyasivr kavita

हरवायला धुक्यात पुन्हा एक प्रवास हवा……
साथ हवी तुझी अन तुझा सहवास हवा….
आनंद….

Poems For Girlfriend In Marathi1

🌸🌸🌸🌸

राहू दे तुझियाकडे पाऊस ओला कालचा
दे मला थेंबातूनी ह्या गंध ओल्या मातीचा

काल भिजल्या कागदावर शब्द होते नेमके
रेघ थोडी पुसट होती, भाव होते बोलके
मैफिली अडल्या तयावाचून कोण्या चाहत्यांचा

कालची बरसात मी ही पाहिली नाही कधी.
गूज पानांचे फुलांशी ऐकले नाही कधी
राहु दे तुझिया मनी ही छंद हा हिंदोळण्याचा

-काव्यप्रथम

Poems For Girlfriend In Marathi

🌸🌸🌸🌸

प्रियकर परिपूर्ण असतो.
नवऱ्याला मर्यादा असतात
कारण संसार हा
व्यवहार आहे.

प्रियकराच्या बाबतीत
संपूर्ण समर्पण असतं.
‘मी’ उरत नाही.
म्हणून संघर्ष नसतो.
संसारात तसं होत नाही.

-वपु काळे

🌸🌸🌸🌸

कवितेचा सार : या कवितेत लेखक वपु काळे सांगतात की कश्या प्रकारे प्रियकर परिपूर्ण असतो.

तू सोबत असतांना, मी कधीच एकटा नसतो…

तू सोबत असतांना, मी कधीच एकटा नसतो….
तुझ्या प्रितीच्या छायेत, मी नुसता विहरत असतो….

तु काही बोललीस की, तो शब्द मी जपून ठेवतो….
तू जर रुसून बसलीस की, त्या शब्दाची सुध्दा कविता करतो…

तुझ्या प्रत्येक स्पर्शावर, माझा शब्द सावरतो…
तु हसून उत्तर दिलेस की, शब्द हि वेड्या सारखा मोहरतो…

तु सोबत असताना, मी माझाच नसतो….
तु सोबत असताना, मी फक्त तुझाच असतो…;

🌸🌸🌸🌸

आठवलं तर अश्रु येतात
न आठवलं तर मन छळते
खरंच प्रेम काय आहे
ते प्रेमात पडल्यावरच कळते.

🌸🌸🌸🌸

कसे लिहू मी?
असे लिहू की तसे लिहू मी ? मला कळेना कसे लिहू मी ?
जणू गुलाबापरी सखे तू! सखे, तुझ्यावर कसे लिहू मी ?

… ओंकार केसकर

🌸🌸🌸🌸

मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते..
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते..
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते..
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस..
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.

🌸🌸🌸🌸

तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला
माझच नाव निघाव,
स्वप्नातही तिला मीच दिसावं
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव

🌸🌸🌸🌸

#इच्छा…


तुला फक्त बघत राहावं
असच नेहमी वाटत,
*साडीतील तुझं #रूप*
*खूप हवंहवंसं वाटतं…*

तुला बघण्याचं #मोह
काय कमी होत नाही,
*किती बघत रहावं पण*
*#मन इच्छा काय थांबत नाही…*

तुझा #विचार करण्याचा
#मोह काय कमी होत नाही,
*कितीही #प्रयत्न केला तरी*
*हा #प्रश्न कधी सुटत नाही…*

तुला अस वाटत का
ठाऊक नाही मनाला,
*बोलत राहावं तुझ्याशी*
*असच वाटत जीवाला…*

दररोजच्या कामकाजातून
थोडा तरी #वेळ काढावा,
*जीवलगच्या इच्छेपोटी*
*मनाला थोडा तरी #ढील द्यावा…*


*आशय:-* प्रत्येक #प्रियसी अन प्रियकराची इच्छा असते एकमेकांबरोबर वेळ व्यतील करण्याची पण कामानिमत्ताने यात #वियोग होतो त्याचंच छोटस सादरीकरण.

🌸🌸🌸🌸

*Wish…*
Just keep looking
Always think so
*Your #look in the #sari*
*I feel very desirable…*

The temptation to look at you
What doesn’t decrease,
*How much to watch but*
*What the mind does not stop #wishing…*

To #think of you
The #temptation does not diminish,
*No matter how hard you try*
*This question never goes away…*

Do you think so
I don’t know,
*Keep talking to you*
*Sounds #like that…*

From daily chores
Take some time,
*For the sake of a #loved one*
*Let the mind #relax a little…*


*Meaning: –* Every #lover and lover #wants to spend #time with each other, but it is a short presentation that separates them due to #work.
*~Kishor Tambe*

🌸🌸🌸🌸

स्तुती…

लाल लाल साडीत
दिसतेस किती गोड,
गुलाबाच्या बागेतील
नाजूक कळी जशी गोड….

वलयदार आकर्षक
नाजूक तिची कंबर,
मनमोहक गुलाबकाठीसारखं
दिसायला खूप सुंदर…

मखमलीसारख रूप
तसा नाजूक बांधा तिचा,
घसरतो त्यावरून नेहमी
समतोल हा या नजरेचा…

बघताना तीच रूप
मन भारावून जात,
प्रेमाच्या या बागेत
पाखरासारखं विहरत…

स्तुती किती करावी
याच कधी भानच नसतं,
कितीही बोलावं
तरी ते अपूर्णच असतं…


आशय:- प्रियसी ची स्तुती कितीही केली तरी ती कमीच असते अन तिला त्यात अनुभवणं यात पण एक वेगळाच भाव/अनुभव असतो.

~Kishor Tambe

🌸🌸🌸🌸

Valentines day Poems for girlfriend in Marathi पण आम्ही पुरवल्या आहेत तुमची खालील पैकी कोणतीही कविता व्हॅलेंटाईन्स डे साठी पण वापरू शकता आणि तुमच्या प्रियसीला खुश करू शकता.

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही

🌸🌸🌸🌸

अनमोल या जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

🌸🌸🌸🌸

कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव,
तिने हळूच माझ्याकडे बघाव
मी बघतांना तिने हळूच लाजाव,
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव
मी दिसताच तिने मग हळूच हसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव

🌸🌸🌸🌸

जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्यावर..
चेहऱ्यावर येणारी Smile हे प्रेम आहे

🌸🌸🌸🌸

प्रेम

” माझं तुझ्यावर प्रेम आहे ! “
हे सांगण्याअगोदरचं , 
डोळे माझे सांगुनी गेले…

” माझा तुझ्यावर जीव जडला आहे ! “
हे सांगण्याअगोदरचं , 

 काळीज माझे गळूनी गेले… 
डोळे डोळयांशी बोलूनी गेले… 

 एकमेकांची भाषा समजूनी गेले… 
 का कुणास ठाऊक…? 

 मन माझे दिवसा-ढवळ्या
तुझ्याचं स्वप्नामध्ये का रमूनी गेले… ? 

 फुलपाखरू होऊनी मन माझे
तुझ्याचंपाशी हरवूनी गेले … ? 

 हद्यामध्ये का कुणास ठाऊक
ओढ मला तुझीच लागते…? 

 माझे मन तुझ्याचंपाशी 
येऊनी का रमते…? 

 जग आता मला कसे हे
वेगळेचं भासते… 

 पऱ्यांच्या दुनियेतील तु 
मला माझी सोनपरी वाटते… 

 माझ्या या भावनांना
तुच सांग आवर कसा घालू… 

 तुझ्याचं सोबत प्रत्येकक्षणी 
 हरवून कसा जावू… 

 प्रेमाच्या या झाडावर
दोन पक्षी बसले… 

 हळुहळू मधूर गाणे
कुणीतरी ऐकले… 

 डोळे भरूनी तुलाच पाहू
आठवणींमध्ये तुझ्याचं मी बुडूनी जावू… 

 जाग येताच क्षणी
चाहूल मला तुझीचं लागते… 

 तुच सांग या वेड्या मनाला
प्रेमाचे गीत कोण कुणासाठी गाते… 

🌸🌸🌸🌸

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर प्रेम म्हणतात

🌸🌸🌸🌸

प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जीवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जीवन प्रेमात असु शकत
नाही
प्रेमात जीवन वाया घालवू नका
पण जीवनात प्रेम करायला विसरु
नका.

🌸🌸🌸🌸

असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे.

🌸🌸🌸🌸

प्रेम हृदयातील एक भावना
कुणाला कळलेली
कुणाला कळून न कळलेली
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली
तर कुणी आयुष्यभर लपवलेली
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी
फक्त एक भावना.

🌸🌸🌸🌸

प्रेम करणं सोपं नसतं
प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.

🌸🌸🌸🌸

झूळझुळ वाहे वारा
मंदमंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात
पांढरा प्रकाश साताजन्म
राहो आपली जोडी
आशी झकास.

🌸🌸🌸🌸

असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी; फुल मनातिल विसरून हेतू.
या हेतूला गंध उदयाचा;
या हेतूची किड मुळाला; फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.
फुल सखे होऊन फुलवेडी,
त्या वेडातच विझव मला तू विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.

गोविंद विनायक करंदीकर

🌸🌸🌸🌸

तुझ्या माझ्या नात्याला काही नाव नसावे
पण आपल्यात आपुलकीचे बंध मात्र असावे

तू माझ्या वर आणि मी तुझ्यावर रुसावे
रुसन झाल्यावर मात्र खळखळून हसावे

आपल्या नात्याला कधीच शेवट नसावे
जिथे तू तिथे मी असावे

झाली आठवण कधी तर
स्वप्नात तू मला आणि मी तुला दिसावे
आणि एकमेकांकळे पाहून लाजल्या वानी हसावे..

खरंच तुझ्या माझ्या नात्याला काही नाव नसावे
पण आपल्यात आपुलकीचे बंध मात्र शेवट पर्यंत असावे

-आदित्य इंगळे

🌸🌸🌸🌸

तिच्यात मायाळू आई
तर कधी हट्टी बहीण सापडते,
ती मैत्रीण बनून पाठ थोपटते
तेव्हा ती नव्याने आवडते.

अक्षय भिंगारदिवे

मित्रांनो तुम्हाला Poems For Girlfriend In Marathi कश्या वाटल्या हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या कविता देखील पाठऊ शकता. धन्यवाद..!

1 thought on “Best 100+ Poems For Girlfriend In Marathi 2024”

Leave a Comment