आजोबा आणि नात कविता | Grandfather and Granddaughter Poem In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत Grandfather and Granddaughter Poem म्हणजेच आजोबा आणि नात कविता. मला खात्री आहे की या कविता तुम्हाला नक्की आवडतील. आम्ही या मोजक्या कविता इंटरनेट वरुण शोधून आणल्या आहेत. जर तुम्हाला देखील तुमच्या कविता या संकेत स्थळावर दाखवायच्या असतील तर त्या टीमहि आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये किंवा आम्हाला ईमेल द्वारे पाठऊ शकता आम्ही तुम्हाला लवकरात लवकर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू.

आजोबा आणि नात कविता

#आजोबा#
।।आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकवला
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल..।।

इवल्याश्या या बोटाना
तुम्ही दिला आधार
सोडून गेला तुम्ही
झालो मी निराधार
टाकले मी जेंव्हा पाऊल पहिले
होता तुम्ही बरोबर
आता आला आहे धीर
पण तुम्ही सोडून गेला खरोखर….

लहानपणापासुन तुमच्या
अंगा खांद्यावर खेळलो
बाबा मारायला आल्यानंतर
तुमच्या कुशीत दडलो
तुम्ही मला चुकवुन कोल्हापुरात गेला
तर खुप वाईट वाटायचा
पण खायला घेउन आल्यानंतर
भानच हरपून जायचा….

अजुनही मला आठंवतय
एक रुपयासाठी तुमचे पाय चेपुन द्यायचो
मिलालेल्या पैश्याचा गारेगार खायचो
रोज़ सकाळी उठल्यावर तुमच्या कड़े जायचो
निरागस चेहरा करून बिस्कीटचा पूडा मागयाचो
गरमगरम कांदा भजी तुम्ही
माझ्यासाठी घेउन यायचा
बेत असायचा माझा सगळा
एकट्यानेच संपवायचा……

खुप सुंदर होत्या त्या आठवणी
खुप मोहक होते ते क्षण
तुमची सोबत असताना
कायमच हरवायाचे मन
तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून
मला चालायच आहे
तुम्ही दिलेल्या शिकवणीतुनच
मला शिकायचा आहे
आणि सगळयांना सांभाळता सांभाळता
हे जग सुद्धा जिंकायचे आहे…

कारण

।।आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकव
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल..।।

शुभम (kolhapur)

🎀🎀🎀

आजोबा तुम्ही नसता तेव्हा अस्वस्थ होतं माझं मन
तुमच्या काठीचा आवाज येता मनावरचे जाते दडपण
आजोबा तुम्ही नसता तेव्हा आयुष्य वाटते अपुरे
तुमच्या येण्याने जीवनात येतात आनंदाचे झरे

💝💝

आजोबा तुम्ही आपल्या घराचा कणखर कणा
झाकून टाकतात आम्हा नातवंडांचा आगाऊपणा 👌
आहेत हट्टी इतके की त्याना वृद्ध बाळच म्हणा
आजोबा म्हणजे म्हातारपणातून आलेला लहानपणा🫂

आजोबा आहेत खजीना आम्हा नातवंडांचा 😊
गोष्टींचा आठवणींचा आणि खोडकर म्हणींचा
मुलांपेक्षा जास्त लाड आम्हा नातवंडांचा👥

आमच्या यशाची आजोबांना सदा वाटते कमाल 😇
त्यात खूप आहेत कष्ट जे त्यांनी घेतले काल
आई बाबांपासून वाचवणारी एकमेव ढाल🛡️
असे माझे आजोबा आहेत खूप छान 💝😍

✨✨✨

मित्रांनो वरील सर्व कविता या वेगवेगळ्या लेखकाने लिहल्या आहेत पण आम्हाला काही लेखकांची नावे सापडली नाहीत. जर तुम्ही यातील कोणत्याही कवितेचे तुम्ही लेखक असाल तर आम्हाला नक्की कळवा. कोणत्याही copyright च्या तक्रारी साठी आमच्याशी संपर्क साधा आम्ही ती कविता नक्की हटवू. धन्यवाद

2 thoughts on “आजोबा आणि नात कविता | Grandfather and Granddaughter Poem In Marathi”

Leave a Comment