तुझा मोह मराठी कविता | 2024

तुझा चेहरा, मनाचा आरसा
निर्मळ, चंचल, अवखळसा
लकाकतो अंधारात जणू
पौर्णिमेचा चंद्र जसा……

जगण्याशी तुझं नातं अतूट
हसणं, आनंदाची लयलूट,
त्यावर साज चढवितो
कुरळ्या केसांचा मुकुट.

पण उगाच बोलत नाहीत
ते शब्दांवर डोलत नाहीत
ते, तुझ्या दोन डोळ्यांचे डोह
सांग कसा आवरावा तुझा मोह ?

मी गोफ शब्दांचे गुंफतो
मनाला या शब्दांशी जुंपतो
पण सुटतच नाही तो
सांग कसा आवरावा तुझा मोह ?

पाहतो जेंव्हा तुझ्या डोळ्यात
हरवतो माझे भान..
सांग कसा आवरावा तुझा मोह?
ADITYA ZINAGE

Leave a Comment