तू जिथे मी तिथे

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे….
पण तू जिथे मी तिथे हा..
प्रेमाचा प्रवास आपला आहे…
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच हमी प्रेमाची आहे…
आवाजाहीन कान माझे
आतुर तुझ्या हाकेला,
अंतर जरी लांबचे तरी
तू जिथे मी तिथे
या अर्थपूर्ण शांततेला ….
मैलाचे जरी अंतर आहे
चेहराही दुरावला आहे,
मनी प्रीत तशीच आहे
तू जिथे मी तिथे
नयनी तुझेच प्रतिबिंब आहे.
आठवता तूज क्षणो क्षणी….
वाटेला डोळे आहेत..
मनालाही ओढ आहे,
तुझ्या भेटीची
तू जिथे मी तिथे
हि नियतीची खोड आहे
आस ही सदैव आहे
माझ्या वेड्या मनाला….
सोबती असो आपण
जसे तू जिथे मी तिथे…..
-ADITYA ZINAGE.
अविस्मरणय दिवस

अविस्मरणय दिवसाची ही बात
कॉलेजमध्ये झाली तुझी माझी भेट ….
बोलता बोलता झाली ती ओळख…..
बघता बघता गुंफले ते मैत्रीचे अतूट बंध..
मैत्री ही अतूट घट्ट होती
पण नकळत
कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलेच नाही
मनी होती एक आस….
द्यावी प्रेमाची कबुली
अन् बनावे हे नातं हे खास…..
दिवस आला तो….
जेंव्हा मनाची गोष्ट मी बोलणार होतो…
कित्येक दिवस ज्याची
आतुरतेने वाट पाहत होतो
तो दिवस आज उजाडला होता
कॉलेजचा च्या समारंभात पाहिले तुला जेंव्हा…
रूप पाहुनी तुझे घायाळ झालो मी पुन्हा..
गुलाबी साडी मध्ये सुंदर दिसत होतीस
जणू स्वर्गाची अप्सरा जवळून पाहिली होती
थोडा भीतीच बोलोलो होतो…..
मनातील शब्द ओठी आणलो होतो….
तुझी निशब्द पण लाजून दिलेला होकार
माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला होता…..
आज दिवस अन् वर्षे सरली व या पुढे सरतील….
पण तो दिवस अविस्मरणयच राहील…
अविस्मरणीय राहील……
-ADITYA ZINAGE