+20 आई साठी पुण्यस्मरण चारोळी आणि पुण्यस्मरण माहिती संदेश मराठी |

मित्रांनो मला माहीत आहे की आई जेव्हा सोडून जाते तेव्हा किती दुख होते असे वाटते की जसे आपल्या डोक्यावरचे अभाळच कोणी तरी हिराऊंन घेतले आहे आणि सर्व जग सूणे सूणे झाले आहे आणि या सर्व भावना व्यक्त करताना आपल्याला शब्द कमी पडतात म्हणूनच मी आज घेऊन आलोय आई च्या पुण्यास्मरणी काही कविता आणि काही संदेश जे की तुम्ही लोकांना सूचना देण्यासाठी कोणालाही WhatsApp वर पाठाऊ शकता आणि तसेच तुम्ही या कविता देखील पाठऊ शकता.

सर्व प्रथम काही संदेश नातेवाईकांना पुण्यतिथीनिमित्त माहिती देण्यासाठी

आज आमच्या आईची पहिली पुण्यतिथी आहे,
या दिवशी, त्याच्या दैवी आत्म्याला स्वर्गात एक स्थान सापडले,
आम्ही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनापासून त्यांचे स्मरण करतो!

🌺🌺🌺🌺

जगातील सर्वोत्कृष्ट आईच्या चरणी माझ्या नमन,
आपण आमच्यात नसू शकता परंतु
आम्हाला खात्री आहे की तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आमच्याबरोबर असतात!

🌺🌺🌺🌺

आम्हाला माहित आहे की जाणारे कधीच येत नाहीत
परंतु त्याच्या आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील,
आज, आमच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त, आम्ही तिला आठवत आहोत!

🌺🌺🌺🌺

तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते,
आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे,
माझा विश्वास आहे की त्याचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर असतील!

🌺🌺🌺🌺

आता पाहू काही कविता ज्या तुम्ही नतेवाईकांना पाठऊ शकता..

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे..

आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल…

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…

– ADITYA SHAM ZINAGE

💝💝💝💝

मायेन भरलेला
कळस म्हणजे आई,
मायेन विसावा देणारी
सावळी म्हणजे आई

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

💝💝💝💝

 आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
आई आकांत श्वासांत शांतता कुजबुज जीवन माझे
आई विन शुन्य आसपास मावळे काळोख जीवन माझे 🙏
आई असता जवळ भासे आकाश जवळ माझे
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
आई आहे असेल असणार कुणी शब्द तोडिले माझे
आई का अपराध असा ईश्वराचा का तेज लपवती माझे 🙏
आई अश्रुंची अभेद्य चौकट चित्रपुराण माझे
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣

💝💝💝💝

माझं दैवत उभं माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी ‘आशीर्वाद’ देण्यास.
माझ्या मना काहीच कळेना,
विसर मनाला लागलो वारीला.
वारी-वारी करून झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी चुकले मनास
‘वैभवाचं मंदिर’ त्यावर कळस.
‘तुळशीसम’ प्रसन्न सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत “मना हिरवं रोपटं”.
आली दाटुनी नयनी आसवे,
मन माझे पोरके झाले.
होतं घरीच दैवत मी निघत वारीत,
मी निघत वारीत माझं दैवत घरात.

💝💝💝💝

वर्षे अनेक झाली
गेली माझी माय 🙏
परंतु तिची सवय
जाणार नाही ❣

कुटुंबासाठी तिने
काया आपली झिजवली 🙏
तक्रार न केली तिने
कधी काही ❣

आम्हास घडविले
अर्थ संस्कार सांगून 🙏
अवघे तिचे जीवन
हेची आमचे गुरु ❣

कसे वागायचे
हे ना करायचे 🙏
नव्हते शब्दांचे
काहीहि काम ❣

आले वाट्या तिच्या
कठीण ते जीवन 👪
आनंदाने जगून
तिने दाखविले ❣

चटके हे दुःखाचे
हसत तिने सोसले 🙏
जीवन सुस्थितित
गर्व करण्यासारखे ❣

अल्प मृत्यू रोगी
लढली ती खंबीर 👪
मानली ना हार
काहीही नाही ❣

दु:ख भोगिले
वेदना होत्या अनेक 🙏
अश्रू परी एक
न तिने दाखविला ❣

तिची अशी दुर्दम्य
अवस्था पाहुनी 👪
मरणही लपुनी
हळूच आले ❣

आहेत साथ अजून
तिच्या आठवणी 🙏
जसे ती होवुनी
माझ्यासोबत वावरती ❣

मला ती सांभाळती
मला हळूच निजवती 🙏
मला दावती चुकता
माझा मार्ग कधी ❣

हवी ती शिक्षा
देवा मला देई 👪
पण कधी आई
माझी नेवू नको ❣

मित्रांनो तुम्हाला या कविता कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला काही कविता पाठवायच्या असतील तर आम्हाला तुम्ही कमेन्ट च्या मदतीने कळऊ शकता तसेच जर तुमच्या काही नवीन कल्पना असतील तरी देखील तुम्ही आम्हाला कळवू शकता. धन्यवाद

Leave a Comment