+भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य,संदेश आणि स्टेटस | Bhavpurna Shradhanjali in Marathi

आपल्या माणसांना दूर जाताना पाहण खरच खूप त्रास देय असत आणि याच बरोबर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देन पण जीवन मरण हे अटळ आणि रोखता न येणार एक सत्य आहे ज्याला आपल्याला कधी ना कधी सामोरे जावेच लागते.

शरीर म्हणजे एक भाड्याच घर आहे ज्याला आपल्याला कधी ना कधी मोकळ तर करवच लागणार आहे. जीवन मरण तर आपल्या हातात नाही पण जागं आपल्या हातात आहे आपण कस जगतोय आणि कस लोकांशी वागतोय हे खूप म्हटवाच आहे. पण हे जरी कितीही खरे असेल तर पण आपण एक माणूस आहोत आपल्याला भावना आहेत. आपण ज्या व्यक्ति बरोबर राहिलो जगलो अश्या व्यक्तींना दूर जाताना पाहणे अत्यंत दुख दयक असतेच म्हणूनच या मनातील भावना शब्दात उतरवण्याचा आम्ही प्रयास आम्ही केला आहे.

आम्ही तुमच्या प्रिय जणांसाठी काही भावपूर्ण श्रद्धांजली कविता, संदेश आणि तसेच शायरी घेऊन आलोय ज्या तुम्ही तुमच्या प्रिय जणाच्या आठवणीत स्टेटस किंवा ग्रुप मध्ये किंवा वरशश्राद्ध मधील पत्रिकेसाठी वापरू शकता तर चला पाहू काही खास अश्या कविता किंवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये .

तुमच्या आयुष्यातील हा कठीण
प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना
की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
मनापासून
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य

श्री …….. यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या
झटक्याने अचानक निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती
देओ व तांच्या कुटुंबास या प्रसंगाचा
सामना करण्याचे सामर्थ्य
देओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना….
…….. जाणे खरोखर मनाला चटका लाऊन गेले.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏

आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या
सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

दुःख निधन
माझे वडील ……यांचे दुःख निधन
झाले आहे.
अंत विधी …….. वाजता आहे.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||🙏

काकांना भावपूर्ण श्रद्धांजली

आमंचे काका श्री …….
यांचे अल्पशा
आजाराने दिनांक रोजी निधन झाले.
ईश्वर
त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏

वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक,
आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि
या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏

आमचे लहान भाऊ ……… यांचे दुःखद निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ💐

देव मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो.
🙏💐Rip.🙏💐

…….. गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी
डोळ्यासमोर आल्या
……. विषयी लिहीणार काय?
अचानक exit मनाला पटली नाही यार
…….
🙏Rest in peace.🙏

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
🙏🌸भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏🌸

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा
जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या
आयुष्याला कोणताच आधार नाही..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..
याचे दु:ख होत आहे.
पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर
लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

आई आजही तुझ्या मायेची उब मला
जाणवते…
कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते….
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा
एकही दिवस जात नाही…
का गेलीस तू मला सोडून आता
मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…
तुझ्या आत्म्यास शांती मिळो.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम
जपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची
काळजी घेणार आहे.
💐बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो.💐

आई आज तू नसलीस तरी तुझी
आठवण येत राहील…
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत
आठवण येत राहील…
आई पुढच्या जन्मीही
तुझ्या पोटीच मला जन्म दे!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती
एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

बाबा तू निघून गेलास अजूनही विश्वास
नाही…
आता तुझ्याशिवाय
जगायचे कसे हेच माहीत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏

अस्वस्थ होतयं मन, अजूनही येतेय
आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏

मायाळू, प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला
वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर
मला अजिबात करमत नाही.
💐भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा.💐

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही आणि ती थांबतही
नाही.. पण हे कोणालाच कसे समजत
नाही की, लाख मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी पूर्ण
होऊ शकत नाही.
🙏😭भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा !🙏😭

आम्हा मित्रांना सोडून गेलास,
पण तू कायमचा
आमच्या स्मृतित राहिलास
आठवण येती तुझी आजपण,
राहवत नाही तुझ्याशिवाय.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.🙏

तुझे जाणे मला कायमचे दु:ख
देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच
मला आधार आहे…
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…😭
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…😭
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

आई बाबा घरी नसताना
कायम दिला तुम्ही आधार
आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…?
🌸 भावपूर्ण श्रद्धांजली.🌸

तू शिवलेल्या गोधडीची उब आजही
मला जाणवते…
तू प्रत्यक्षात नसली तरी
तुझी माया सोबत आहे…
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आजी .🙏

तुमची सावली होती म्हणून कधीच
वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी
वाटलेच नव्हते ठायी…
भावपूर्ण श्रद्धांजली.

आपलं ठरलं होत ना आजी / आजोबा…
तुम्ही मला कुठेही सोडून जाणार नाही..
मग आज हा दिवस माझ्या
नशीबी का आला हे मला उमगत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

आई बाबानंतर सगळ्यात जवळची
व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल
असे वाटलेसुद्धा नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली .😭

सर्वांना हवेहवेसे वाटणारे
व सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्व
आपल्यातून निघून गेले.
त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.
😭💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.😭💐

काका म्हणुन सर्वांचे परिचित असलेले मृदु
स्वभावाचे आपल्या ……. चे कर्मचारी यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

भावपूर्ण श्रद्धांजली .
सर्वांचे लाडके काका…
आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व स्व………
यांचे आज निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी
प्रार्थना! तसेच या कठीण समयी
त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख
पेलण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना!🙏

ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,
यहिं तक था सफर अपना…
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
💐😭भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐😭

अतिशय कष्टातून
कुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडत
असतांना
अचानक घेतलेली एक्झिट
मनाला चटका लावून गेली…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली मामा.🙏

व्यर्थ न हो बलिदान
……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्र
शहीद ………..
हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरत
असताना शहिद झाले. ……. तालुक्याचा
लोकप्रतिनिधी
म्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी व
माझे कुटुंब सामील आहे.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

आम्ही तूमच्या पुढे सादर केलेल भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्हाला कसे वाटले जरी तुम्हाला यात काही कमी वाटली तर आम्हाला नक्की कळवा आणि आम्हाला त्या सुधारण्यास मदत करा किंवा तुम्ही आमच्या व्हातसप्प ग्रुप मध्ये जॉइन होऊन पण मदत करू शकता.

तसेच तुम्ही आम्हाला तूमच्या कविता किवा संदेश डायरेक्ट्लि पाठऊ शकता आम्ही त्या आमच्या साइट वर नक्की प्रसारित करू, धन्यवाद..!

1 thought on “+भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य,संदेश आणि स्टेटस | Bhavpurna Shradhanjali in Marathi”

 1. एक अजून आकाश उभा असतो
  एक अजून चांदणं जगतो
  एक अजून सूर्य असतो
  पण आता आमच्या जीवाच्या अंत्यात
  एक अजून माणूस मृत्यूसं जागतो

  आज आमचा मन भावपूर्ण श्रद्धांजली देणार
  हाक मातल्या जागतिक सारख्या अजून एकांतात
  पण त्यांची स्मृती आमच्या हृदयात सदैव राहणार

  त्यांना आमच्या स्मरणात नेऊन प्रणाम
  त्यांच्या चेहऱ्यावर नेऊन सलाम
  त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच विनंती
  त्यांच्या मुख्यावर जागृत आहोत आम्ही सदैव याचनी

  त्यांची याद आमच्या स्मृतींमध्ये सदैव राहील
  आणि आम्ही त्यांच्यासाठी पुष्प अर्पण करील
  त्यांच्या स्मृती आमच्या हृदयात जगावी
  त्यांच्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध राहावे.

  Reply

Leave a Comment