Marathi kavita – 100poems https://www.100poems.in Poetry is a way of taking life by the throat Sat, 30 Mar 2024 16:40:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.4 https://www.100poems.in/wp-content/uploads/2022/08/cropped-android-chrome-512x512-1-32x32.png Marathi kavita – 100poems https://www.100poems.in 32 32 Best 100+ Poems For Girlfriend In Marathi 2024 https://www.100poems.in/best-poems-for-girlfriend-in-marathi https://www.100poems.in/best-poems-for-girlfriend-in-marathi#comments Wed, 10 Jan 2024 02:27:06 +0000 https://www.100poems.in/?p=280 नमस्कार मित्रांनो आज आपण Poems For Girlfriend In Marathi पाहणार आहोत, तुम्हाला आणि तुमच्या प्रियसीला या प्रयसी वर मराठी कविता नक्की आवडतील. प्रियसी म्हणजेच जिला आपण English मध्ये Girlfriend म्हणतो तिला खुश ठेवण जितकच अवघड आहे तितकच सोपं आहे मुलींना खुश करन्यासाठी महागड्या गिफ्टच हव्यात अस नाही तुम्ही त्यांना अश्या छोट्या छोट्या कविता पण पाठऊ शकता किंवा बोलून दाखवू शकता. मला नक्की खात्री आहे की तुमची गर्लफ्रेंड नक्की खुश होईल.

तुम्ही या कविता तुमच्या प्रियसीला तिच्या वाढदिवसाला देखील कविता पाठवू शकता किंवा एखादे मस्त असे ग्रीटिंग कार्ड बनवून त्यावर या कविता लिहू शकता आम्ही ग्रीटिंग कार्ड साठी कविता देखील आम्ही दिल्या आहेत. तुम्ही त्या कविता थोडे बदल करून देखील ग्रीटिंग कार्ड वर लिहू शकता. तुम्ही या कविता poems for girlfriends birthday असे सर्च करून देखील मिळवू शकता. तुम्ही या कविता instagram वर देखील पाहू शकता आणि यांचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही आसन नही जिंदगी ही कविता पण वाचू शकता

Priyasivr kavita

हरवायला धुक्यात पुन्हा एक प्रवास हवा……
साथ हवी तुझी अन तुझा सहवास हवा….
आनंद….

Poems For Girlfriend In Marathi1

🌸🌸🌸🌸

राहू दे तुझियाकडे पाऊस ओला कालचा
दे मला थेंबातूनी ह्या गंध ओल्या मातीचा

काल भिजल्या कागदावर शब्द होते नेमके
रेघ थोडी पुसट होती, भाव होते बोलके
मैफिली अडल्या तयावाचून कोण्या चाहत्यांचा

कालची बरसात मी ही पाहिली नाही कधी.
गूज पानांचे फुलांशी ऐकले नाही कधी
राहु दे तुझिया मनी ही छंद हा हिंदोळण्याचा

-काव्यप्रथम

Poems For Girlfriend In Marathi

🌸🌸🌸🌸

प्रियकर परिपूर्ण असतो.
नवऱ्याला मर्यादा असतात
कारण संसार हा
व्यवहार आहे.

प्रियकराच्या बाबतीत
संपूर्ण समर्पण असतं.
‘मी’ उरत नाही.
म्हणून संघर्ष नसतो.
संसारात तसं होत नाही.

-वपु काळे

🌸🌸🌸🌸

कवितेचा सार : या कवितेत लेखक वपु काळे सांगतात की कश्या प्रकारे प्रियकर परिपूर्ण असतो.

तू सोबत असतांना, मी कधीच एकटा नसतो…

तू सोबत असतांना, मी कधीच एकटा नसतो….
तुझ्या प्रितीच्या छायेत, मी नुसता विहरत असतो….

तु काही बोललीस की, तो शब्द मी जपून ठेवतो….
तू जर रुसून बसलीस की, त्या शब्दाची सुध्दा कविता करतो…

तुझ्या प्रत्येक स्पर्शावर, माझा शब्द सावरतो…
तु हसून उत्तर दिलेस की, शब्द हि वेड्या सारखा मोहरतो…

तु सोबत असताना, मी माझाच नसतो….
तु सोबत असताना, मी फक्त तुझाच असतो…;

🌸🌸🌸🌸

आठवलं तर अश्रु येतात
न आठवलं तर मन छळते
खरंच प्रेम काय आहे
ते प्रेमात पडल्यावरच कळते.

🌸🌸🌸🌸

कसे लिहू मी?
असे लिहू की तसे लिहू मी ? मला कळेना कसे लिहू मी ?
जणू गुलाबापरी सखे तू! सखे, तुझ्यावर कसे लिहू मी ?

… ओंकार केसकर

🌸🌸🌸🌸

मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते..
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते..
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते..
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस..
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.

🌸🌸🌸🌸

तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला
माझच नाव निघाव,
स्वप्नातही तिला मीच दिसावं
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव

🌸🌸🌸🌸

#इच्छा…


तुला फक्त बघत राहावं
असच नेहमी वाटत,
*साडीतील तुझं #रूप*
*खूप हवंहवंसं वाटतं…*

तुला बघण्याचं #मोह
काय कमी होत नाही,
*किती बघत रहावं पण*
*#मन इच्छा काय थांबत नाही…*

तुझा #विचार करण्याचा
#मोह काय कमी होत नाही,
*कितीही #प्रयत्न केला तरी*
*हा #प्रश्न कधी सुटत नाही…*

तुला अस वाटत का
ठाऊक नाही मनाला,
*बोलत राहावं तुझ्याशी*
*असच वाटत जीवाला…*

दररोजच्या कामकाजातून
थोडा तरी #वेळ काढावा,
*जीवलगच्या इच्छेपोटी*
*मनाला थोडा तरी #ढील द्यावा…*


*आशय:-* प्रत्येक #प्रियसी अन प्रियकराची इच्छा असते एकमेकांबरोबर वेळ व्यतील करण्याची पण कामानिमत्ताने यात #वियोग होतो त्याचंच छोटस सादरीकरण.

🌸🌸🌸🌸

*Wish…*
Just keep looking
Always think so
*Your #look in the #sari*
*I feel very desirable…*

The temptation to look at you
What doesn’t decrease,
*How much to watch but*
*What the mind does not stop #wishing…*

To #think of you
The #temptation does not diminish,
*No matter how hard you try*
*This question never goes away…*

Do you think so
I don’t know,
*Keep talking to you*
*Sounds #like that…*

From daily chores
Take some time,
*For the sake of a #loved one*
*Let the mind #relax a little…*


*Meaning: –* Every #lover and lover #wants to spend #time with each other, but it is a short presentation that separates them due to #work.
*~Kishor Tambe*

🌸🌸🌸🌸

स्तुती…

लाल लाल साडीत
दिसतेस किती गोड,
गुलाबाच्या बागेतील
नाजूक कळी जशी गोड….

वलयदार आकर्षक
नाजूक तिची कंबर,
मनमोहक गुलाबकाठीसारखं
दिसायला खूप सुंदर…

मखमलीसारख रूप
तसा नाजूक बांधा तिचा,
घसरतो त्यावरून नेहमी
समतोल हा या नजरेचा…

बघताना तीच रूप
मन भारावून जात,
प्रेमाच्या या बागेत
पाखरासारखं विहरत…

स्तुती किती करावी
याच कधी भानच नसतं,
कितीही बोलावं
तरी ते अपूर्णच असतं…


आशय:- प्रियसी ची स्तुती कितीही केली तरी ती कमीच असते अन तिला त्यात अनुभवणं यात पण एक वेगळाच भाव/अनुभव असतो.

~Kishor Tambe

🌸🌸🌸🌸

Valentines day Poems for girlfriend in Marathi पण आम्ही पुरवल्या आहेत तुमची खालील पैकी कोणतीही कविता व्हॅलेंटाईन्स डे साठी पण वापरू शकता आणि तुमच्या प्रियसीला खुश करू शकता.

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही

🌸🌸🌸🌸

अनमोल या जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

🌸🌸🌸🌸

कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव,
तिने हळूच माझ्याकडे बघाव
मी बघतांना तिने हळूच लाजाव,
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव
मी दिसताच तिने मग हळूच हसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव

🌸🌸🌸🌸

जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्यावर..
चेहऱ्यावर येणारी Smile हे प्रेम आहे

🌸🌸🌸🌸

प्रेम

” माझं तुझ्यावर प्रेम आहे ! “
हे सांगण्याअगोदरचं , 
डोळे माझे सांगुनी गेले…

” माझा तुझ्यावर जीव जडला आहे ! “
हे सांगण्याअगोदरचं , 

 काळीज माझे गळूनी गेले… 
डोळे डोळयांशी बोलूनी गेले… 

 एकमेकांची भाषा समजूनी गेले… 
 का कुणास ठाऊक…? 

 मन माझे दिवसा-ढवळ्या
तुझ्याचं स्वप्नामध्ये का रमूनी गेले… ? 

 फुलपाखरू होऊनी मन माझे
तुझ्याचंपाशी हरवूनी गेले … ? 

 हद्यामध्ये का कुणास ठाऊक
ओढ मला तुझीच लागते…? 

 माझे मन तुझ्याचंपाशी 
येऊनी का रमते…? 

 जग आता मला कसे हे
वेगळेचं भासते… 

 पऱ्यांच्या दुनियेतील तु 
मला माझी सोनपरी वाटते… 

 माझ्या या भावनांना
तुच सांग आवर कसा घालू… 

 तुझ्याचं सोबत प्रत्येकक्षणी 
 हरवून कसा जावू… 

 प्रेमाच्या या झाडावर
दोन पक्षी बसले… 

 हळुहळू मधूर गाणे
कुणीतरी ऐकले… 

 डोळे भरूनी तुलाच पाहू
आठवणींमध्ये तुझ्याचं मी बुडूनी जावू… 

 जाग येताच क्षणी
चाहूल मला तुझीचं लागते… 

 तुच सांग या वेड्या मनाला
प्रेमाचे गीत कोण कुणासाठी गाते… 

🌸🌸🌸🌸

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर प्रेम म्हणतात

🌸🌸🌸🌸

प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जीवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जीवन प्रेमात असु शकत
नाही
प्रेमात जीवन वाया घालवू नका
पण जीवनात प्रेम करायला विसरु
नका.

🌸🌸🌸🌸

असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे.

🌸🌸🌸🌸

प्रेम हृदयातील एक भावना
कुणाला कळलेली
कुणाला कळून न कळलेली
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली
तर कुणी आयुष्यभर लपवलेली
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी
फक्त एक भावना.

🌸🌸🌸🌸

प्रेम करणं सोपं नसतं
प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.

🌸🌸🌸🌸

झूळझुळ वाहे वारा
मंदमंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात
पांढरा प्रकाश साताजन्म
राहो आपली जोडी
आशी झकास.

🌸🌸🌸🌸

असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी; फुल मनातिल विसरून हेतू.
या हेतूला गंध उदयाचा;
या हेतूची किड मुळाला; फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.
फुल सखे होऊन फुलवेडी,
त्या वेडातच विझव मला तू विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.

गोविंद विनायक करंदीकर

🌸🌸🌸🌸

तुझ्या माझ्या नात्याला काही नाव नसावे
पण आपल्यात आपुलकीचे बंध मात्र असावे

तू माझ्या वर आणि मी तुझ्यावर रुसावे
रुसन झाल्यावर मात्र खळखळून हसावे

आपल्या नात्याला कधीच शेवट नसावे
जिथे तू तिथे मी असावे

झाली आठवण कधी तर
स्वप्नात तू मला आणि मी तुला दिसावे
आणि एकमेकांकळे पाहून लाजल्या वानी हसावे..

खरंच तुझ्या माझ्या नात्याला काही नाव नसावे
पण आपल्यात आपुलकीचे बंध मात्र शेवट पर्यंत असावे

-आदित्य इंगळे

🌸🌸🌸🌸

तिच्यात मायाळू आई
तर कधी हट्टी बहीण सापडते,
ती मैत्रीण बनून पाठ थोपटते
तेव्हा ती नव्याने आवडते.

अक्षय भिंगारदिवे

मित्रांनो तुम्हाला Poems For Girlfriend In Marathi कश्या वाटल्या हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या कविता देखील पाठऊ शकता. धन्यवाद..!

]]>
https://www.100poems.in/best-poems-for-girlfriend-in-marathi/feed 1
Best Marathi Poems On Nature 2024 https://www.100poems.in/marathi-poems-on-nature https://www.100poems.in/marathi-poems-on-nature#comments Tue, 09 Jan 2024 02:26:35 +0000 https://www.100poems.in/?p=275 नमस्कार मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलोय खास निसर्गावर [Marathi Poems On Nature] काही सुंदर अश्या कवितांचे कलेक्शन जे की तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो. सध्या तरी इथे जरा कवितांची संख्या कमी आहे पण आम्ही या संख्यांमद्धे भर घालण्याचा प्रयत्न करत आहोत. जर का तुम्हाला तुमची कविताआपल्या साइट वर दाखवायची असेल तर आम्हाला तुम्ही पाठऊ शकता आणि कवितांची संख्या 100+ नेण्यास मदत करू शकाल.

निसर्ग

येता तुझ्या कुशीत निसर्गा
बेहद्द जगावेसे वाटले
उमलत्या नाजूक कळ्यांना
पाहून हसावेसे वाटले

तलम ओली माया मातीची
पात्यांशी बोलावेसे वाटले
हिरवा वारा हिरवे पक्षी
जंगल व्हावेसे वाटले

© संदीप राऊत ~वाचू आनंदे

आनंदी पक्षी

केव्हा मारुनि उंच भरारी । नभात जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी। आनंदे भरली.
आनंदाचे फिरती वारे। आनंदाने चित्त ओसरे,
आनंदे खेळतो कसा रे। आनंदी पक्षी !

हिरवे हिरवे रान विलसते । वृक्षलतांची दाटी जेथे,
प्रीती शांती जिथे खेळते । हा वसतो तेथे
सुंदर पुष्पे जिथे विकसली। सरोवरी मधु कमले फुलली
करीत तेथे सुंदर केली । बागडतो छंदे.

हासवितो लतिकाकुंजांना । प्रेमे काढी सुंदर ताना;
आनंदाच्या गाउन गाना । आनंदे रमतो
जीवित सारे आनंदाचे । प्रेमरसाने भरले त्याचे;
म्हणोनिया तो रानी नाचे । प्रेमाच्या छंदे

आम्हाकरिता दुर्धर चिंता । नाना दु:खे हाल सभोता,
पुरे! नको ही नरतनु आता । दुःखाची राशी !
बा, आनंदी पक्ष्या, देई। प्रसाद अपुला मजला काही,
जेणे मन हे रंगुनि जाई। प्रेमाच्या डोही,

उंच भराऱ्या मारित जाणे । रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाइल चित्त जयाने । दे, दे ते गाणे !

निसर्गासारखा नाही रे सोयरा..

निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली

नभ उतरू आलं..

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

– ना. धो. महानोर

निसर्ग

माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल,
माझा अनुभव कधी घेतलाच नसेल,
माझ्या कुशीत कधी येऊन पहा,
कधी मलाही तुम्ही जवळून पहा

प्रगती

दिवसागणिक प्रगती, 
समृद्धि करतोय माणुस…

निसर्गाचा ऱ्हास करून 
शहरे वाढवतोय माणुस…

स्वतः केलेल्या प्रगतीवर,
स्वतःच आपली थोपटून 
पाठ घेतोय माणुस…

आपल्याच मरणाची
तयारी करून 
ठेवु लागलाय माणुस…

निसर्ग न्यारा

पानांची ती झुळूक,
पाण्याच्या त्या सरी.
मंद मंद वाहे,
हवेच्या त्या लहरी.

गजबज झुडुपात करे,
किलबिल तो पक्षांचा थवा.
फुलपाखरू जणू बसुनी,
फुलांवरी घेई जन्म नवा.

काळोख मेघ बघुनी,
नाचे थुई थुई तो मोर.
होऊनी आनंदी हरणीपण,
गिरक्या घेती जोर.

निसर्ग आणि प्रदूषण

शेती म्हातारी झाली
कारखाने जन्मले
हवेत वायू सोडून
कित्येक भोपळी मेले

सायकल गेल्या
मोटारी चालू लागल्या
धुरांडया त्यांच्या
नाकाला लोंबु लागल्या

पाण्याचा माठ
मातीतच गेला
शीतगृहातला वायु
ओझोन चिरत गेला

छतावरचा पंखा आता
निपचित पडून असतो
ए . सी . मात्र दिवसरात्र
गालात हसत असतो

खाण्याच्या तोंडाची
फुकणी बनली
मरण्याच्या निमित्ताला
एक दांडी पुरली

हे विभिन्न वायू सारे
आजूबाजूलाच वसतात
शरीरात घुसून हळूच
आयुष्याचे गणित चुकवतात

निसर्गास घातक प्रदुषण

कैसे संकट
हवा प्रदूषणाचे…
हे टाळायचे…

हे प्रदूषण
संकटाचे द्योतक…
परी घातक…

हा प्राणवायू
असे मिळे अशुद्ध…
संकट खुद्द…

महत्त्व आहे
राहण्याला जिवंत…
प्रदूषणात…

आहे अशक्य
म्हणून वेळे जागा…
जपे हा धागा…

पर्यावरण
जगण्याचा आधार…
ते निराधार…

ही वसुंधरा
रडे नित्य नेमाने…
प्रदुषणाने…

झाडे लावा
प्रदूषणच टाळा…
बसवू आळा…

]]>
https://www.100poems.in/marathi-poems-on-nature/feed 1
Poems On First Love In Marathi 2024 https://www.100poems.in/poems-on-first-love-in-marathi https://www.100poems.in/poems-on-first-love-in-marathi#respond Mon, 08 Jan 2024 02:31:01 +0000 https://www.100poems.in/?p=394 Read more

]]>

तू जिथे मी तिथे

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे….
पण तू जिथे मी तिथे हा..
प्रेमाचा प्रवास आपला आहे…

जन्मभर राहिली साथ आपुली
हीच हमी प्रेमाची आहे…
आवाजाहीन कान माझे
आतुर तुझ्या हाकेला,
अंतर जरी लांबचे तरी
तू जिथे मी तिथे
या अर्थपूर्ण शांततेला ….

मैलाचे जरी अंतर आहे
चेहराही दुरावला आहे,
मनी प्रीत तशीच आहे
तू जिथे मी तिथे
नयनी तुझेच प्रतिबिंब आहे.

आठवता तूज क्षणो क्षणी….
वाटेला डोळे आहेत..
मनालाही ओढ आहे,
तुझ्या भेटीची
तू जिथे मी तिथे
हि नियतीची खोड आहे


आस ही सदैव आहे
माझ्या वेड्या मनाला….
सोबती असो आपण
जसे तू जिथे मी तिथे…..


-ADITYA ZINAGE.

अविस्मरणय दिवस

अविस्मरणय दिवसाची ही बात
कॉलेजमध्ये झाली तुझी माझी भेट ….
बोलता बोलता झाली ती ओळख…..
बघता बघता गुंफले ते मैत्रीचे अतूट बंध..

मैत्री ही अतूट घट्ट होती
पण नकळत
कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलेच नाही

मनी होती एक आस….
द्यावी प्रेमाची कबुली
अन् बनावे हे नातं हे खास…..

दिवस आला तो….
जेंव्हा मनाची गोष्ट मी बोलणार होतो…
कित्येक दिवस ज्याची
आतुरतेने वाट पाहत होतो
तो दिवस आज उजाडला होता

कॉलेजचा च्या समारंभात पाहिले तुला जेंव्हा…
रूप पाहुनी तुझे घायाळ झालो मी पुन्हा..
गुलाबी साडी मध्ये सुंदर दिसत होतीस
जणू स्वर्गाची अप्सरा जवळून पाहिली होती

थोडा भीतीच बोलोलो होतो…..
मनातील शब्द ओठी आणलो होतो….
तुझी निशब्द पण लाजून दिलेला होकार

माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला होता…..
आज दिवस अन् वर्षे सरली व या पुढे सरतील….
पण तो दिवस अविस्मरणयच राहील…
अविस्मरणीय राहील……

-ADITYA ZINAGE

]]>
https://www.100poems.in/poems-on-first-love-in-marathi/feed 0
[127+] पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Anniversary wishes for husband in Marathi https://www.100poems.in/anniversary-wishes-for-husband-in-marathi https://www.100poems.in/anniversary-wishes-for-husband-in-marathi#respond Sun, 07 Jan 2024 02:36:30 +0000 https://www.100poems.in/?p=747 Read more

]]>
एक स्त्री म्हणून, माझा विश्वास आहे की विवाह ही प्रेम, आदर आणि विश्वास यावर बांधलेली भागीदारी आहे. लग्नासाठी दोन्ही भागीदारांकडून प्रयत्न करावे लागतात, परंतु बक्षिसे अंतहीन आहेत.

वर्धापनदिन हा पती-पत्नीमधील प्रेम आणि वचनबद्धतेवर प्रतिबिंबित करण्याचा एक विशेष वेळ आहे. हा आनंद आणि विजय, तसेच आव्हाने आणि संकटे साजरे करण्याची वेळ आहे, ज्यावर एकत्रितपणे मात केली गेली आहे.

महिलांसाठी, वर्धापनदिन ही आम्ही आमच्या भागीदारांसह सामायिक केलेल्या मजबूत बंधनाची आठवण करून देतो. त्यांच्या प्रेमाची, समर्थनाची आणि प्रोत्साहनाची प्रशंसा करण्याची ही वेळ आहे. आपण केलेल्या आठवणी आणि आपल्याला जवळ आणलेल्या क्षणांवर चिंतन करण्याची ही वेळ आहे. पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Anniversary wishes for husband in Marathi

शेवटी, वर्धापनदिन हा प्रेम आणि वचनबद्धतेचा उत्सव आहे. हे एक स्मरणपत्र आहे की आपल्यासमोर कोणतीही आव्हाने आली तरी, आपण एकमेकांवर अवलंबून आहोत आणि आपल्याला पाठिंबा देऊ शकतो. महिला या नात्याने, आम्ही आमच्या पतीच्या प्रेम आणि भागीदारीबद्दल कृतज्ञ आहोत आणि आम्ही आणखी अनेक वर्षे एकत्र आनंदाची वाट पाहत आहोत.

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

लग्न हे दोन लोकांमधील एक विशेष बंधन आहे ज्यांनी त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्याचे वचन दिले आहे. दरवर्षी, जोडपे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना, ते प्रेम, वचनबद्धता आणि भागीदारी यावर विचार करण्याची संधी देते ज्याने त्यांना जाड आणि पातळ माध्यमातून एकत्र ठेवले आहे.

भारताच्या महाराष्ट्र राज्यात, मराठी ही लोक बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा आणि तुमच्या पतीबद्दलचे प्रेम मराठीत कसे व्यक्त करायचे याच्या कल्पना शोधत असाल, तर येथे काही सूचना आहेत:

  1. रोमँटिक गेटवेची योजना करा: तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून विश्रांती घ्या आणि तुमचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी रोमँटिक गेटवेची योजना करा. ही जवळपासच्या गंतव्यस्थानासाठी शनिवार व रविवारची सहल असू शकते किंवा तुमच्या दोघांसाठी विशेष अर्थ असलेल्या ठिकाणी दीर्घ सुट्टी असू शकते.
  2. आपल्या पतीला भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित करा: आपल्या पतीला विचारपूर्वक भेट देऊन आश्चर्यचकित करा जे दर्शवते की आपण त्याचे किती कौतुक करतो. हे हस्तलिखीत प्रेम चिठ्ठीसारखे सोपे काहीतरी असू शकते किंवा दागिन्यांचा तुकडा किंवा गॅझेट सारखे काहीतरी अधिक विस्तृत असू शकते ज्यावर तो डोळा मारत आहे.
  3. त्याचे आवडते जेवण बनवा: जर तुमचा नवरा खाण्याचे शौकीन असेल तर त्याचे आवडते जेवण घरी तयार करा. हे केवळ त्याच्यासाठी एक खास ट्रीटच नाही तर स्वयंपाकघरात एकत्र वेळ घालवण्याची संधी देखील असेल.
  4. वॉक डाउन मेमरी लेन घ्या: तुम्ही जोडपे म्हणून शेअर केलेल्या खास क्षणांची आठवण करून द्या. जुनी छायाचित्रे पहा, तुम्ही जिथे पहिल्यांदा भेटलात त्या ठिकाणी पुन्हा भेट द्या किंवा तुमची पहिली तारीख पुन्हा तयार करा.
  5. प्रेमपत्र लिहा: तुमच्या पतीबद्दलच्या तुमच्या भावना मनापासून प्रेमपत्रात व्यक्त करा. त्याच्याबद्दल तुम्हाला काय आवडते, तुमच्या आठवणी आणि भविष्याबद्दलच्या तुमच्या आशा याबद्दल लिहा. ही एक आठवण असेल जी त्याला पुढील अनेक वर्षे जपली जाईल.

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !
Happy Anniversary My Husband

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे आपल्या
दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे
तु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू…
Happy Anniversary My Husband

Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

मी माझ्या पतीसोबतच्या लग्नाच्या दुसर्‍या वर्षावर विचार करत असताना, आम्ही सामायिक केलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आमचा एकत्र प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे, पण या सगळ्यातून आम्ही एकमेकांशी बांधील राहिलो.

माझा नवरा माझा सर्वात चांगला मित्र, माझा विश्वासू आणि माझा सोबती आहे. तो माझ्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी बाहेर आणतो आणि मी केलेल्या प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा देतो. त्याला माझ्या बाजूने मिळाल्याबद्दल मी आश्चर्यकारकपणे भाग्यवान समजतो.

आमचे प्रेम प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह अधिक दृढ होत गेले आहे आणि मी आणखी अनेक वर्षांच्या आनंदाची आणि साहसाची वाट पाहत आहे. आम्ही केलेल्या आठवणी आणि आम्ही सामायिक केलेले क्षण मी जपतो आणि भविष्यात आणखी तयार करण्यासाठी मी उत्सुक आहे.

आमच्या वर्धापनदिनानिमित्त माझ्या पतीला, मी विचारू शकणाऱ्या सर्वात आश्चर्यकारक भागीदाराबद्दल मला धन्यवाद म्हणायचे आहे. तू माझे जीवन प्रत्येक प्रकारे चांगले बनवतेस आणि मी तुझा खूप आभारी आहे. येथे प्रेम, हशा आणि आनंदाचे आणखी एक वर्ष आहे. मी दररोज तुझ्यावर अधिक प्रेम करतो.

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते
एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary My Husband

प्रेम म्हणजे समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary My Husband

आपल्याआयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहोत
आपले आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले
असू आपले जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Anniversary wishes in Marathi for husband

त्याच वेळी, वर्धापनदिन देखील आत्म-चिंतन करण्याची वेळ आहे. महिला या नात्याने, आपण लग्नासाठी आपले स्वतःचे योगदान पाहणे आणि भागीदार म्हणून आपण कसे वाढू आणि सुधारू शकतो याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आपण आपल्या पतींशी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधण्यास आणि आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यास तयार असले पाहिजे.

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
Happy Wedding Anniversary My Cute Husband

छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय ते पण तुझ्यावर !
Happy Anniversary My Husband

भरतीवेळी फेसाळलेला महासागर आणि हाती तुझा
हात रेश्मा स्पर्श या रेतीचा तशीच प्रेमळआपल्या दोघांची
साथ तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Marriage anniversary wishes in Marathi for husband

प्रिय मंडळी,

आज मी येथे उभी असताना, मी आणि माझ्या पतीने वर्षानुवर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आज आमच्या एकत्र प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड आहे, आणि आमचा वर्धापनदिन तुम्हा सर्वांसोबत साजरा करण्याचा मला सन्मान वाटतो.

माझ्या प्रिय पतीला, मला असे म्हणायचे आहे की मी तुझ्यावर शब्द व्यक्त करण्यापेक्षा जास्त प्रेम करतो. ज्या दिवसापासून आपण भेटलो त्या दिवसापासून तू माझा रॉक, माझा विश्वासू आणि माझा सर्वात चांगला मित्र आहेस आणि तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी दररोज देवाचे आभार मानतो.

वर्षानुवर्षे, आम्ही आमच्या प्रामाणिक वाटा आव्हानांचा सामना केला आहे, परंतु आम्ही आनंदाचे आणि आनंदाचे असंख्य क्षण देखील अनुभवले आहेत. या सर्वांद्वारे आम्ही एकमेकांशी बांधील राहिलो आणि आमचे प्रेम आणखी घट्ट झाले.

या विशेष दिवशी, मी कधीही विचारू शकलेला सर्वोत्तम भागीदार असल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. माझ्या सर्व प्रयत्नांमध्ये तू मला साथ दिलीस, माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मला प्रोत्साहित केलेस आणि जाड आणि पातळ माझ्या पाठीशी उभे राहिले.

मी पुढील वर्षांची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला माहीत आहे की आमचे प्रेम वाढतच जाईल. माझे पती, माझे जीवनसाथी आणि माझे कायमचे प्रेम असल्याबद्दल धन्यवाद.

हे प्रेम, हशा आणि आनंदाचे आणखी एक वर्ष आहे.

चिअर्स!

ईश्वरास हीच प्रार्थना करतो की तुमची जोडी
कायम अशीच राहो आयुष्यात येणाऱ्या सुख
दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावातुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे..
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि
एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Happy Anniversary My Husband

Anniversary quotes for husband in Marathi

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते
एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary My Husband

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Anniversary wishes for husband

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अॅनिव्हर्सरी

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात आहात
Love You Dear
Happy Anniversary

कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला
एकमेकांना अशीच साथ देत राहो ..
प्रेम कधीच कमी न हो आई भवानी ची
कृपादृष्टी आपल्यावर सदा राहू दे तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना !
Happy Anniversary My Husband

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
Happy Anniversary My Husband

Heart touching anniversary wishes for husband in Marathi

मी देवाची ऋणी आहे
ज्याने मला तुझ्यासारखा नवरा दिला
आता मला देवाकडून काही नको आहे !
Happy Anniversary My Husband

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तूच मला साथ दिलीस तू
सोबत असलास की कशाची भीती वाटत नाही या
वाढदिवसाच्या निमित्ताने मला तू दिलेल्या सात वर्षांची
खरी जाणीव करून दिलीस तू जरी सांगत नसलं तरी
मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस प्रत्येक
क्षण मी मला तू नवरा म्हणून मिळावा हीच ईश्वराकडे
प्रार्थना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 💑 💗

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस
रुसली कधी मी तुझ्यावर तर जवळ मला घेतोस
रडवले कधी मी तुला तर कधी हसवले
माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास !
Happy Anniversary My Husband

Anniversary wishes for husband Marathi

सुख दुखात मजबूत राहिली आपले नाते
एकमेकांबद्दल काळजी आणि ममता नेहमी
वाढत राहो आपल्या संसाराची गोडी आजचा
खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
Happy Wedding Anniversary My Cute Husband

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून
प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !
Happy Anniversary My Husband

Anniversary quotes for husband in Marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शेवटी तुम्हा दोघांचे लग्न झाले आता तुमची
सुटका नाही तुम्ही दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत
अडकलाततुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही.
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट

Happy anniversary hubby in Marathi.

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary

तू माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आहेस,
मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
मी तुझ्यावर प्रेम करतो, आई लव यू नवरा !
Happy Anniversary My Husband

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू !
Happy Anniversary My Husband

नवऱ्यासाठी मराठी कविता

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….

झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश
त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली
जोडी आशी झकास.👌

त्या प्रेमाच्या गावात
दोघेही जाऊ
प्रेम करताना दोघे
प्रीत नव्याने लिहू…

तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया….

विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा….
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं….
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..

प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक
क्षणी तुलाच मी पाहिलं
हृदयरुपी पुष्प माझं
तुलाच फक्त मी वाहिलंय.

घेऊत मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय
आता तूच समजावं याला.

वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले.

एकांतातले माझे मधूर गाणे

मी गुणगुणत असते सदा… 

माझ्या या गुणगुण गाण्याला 

तुच तार छेडीतो सदा… 

नवऱ्यासाठी मराठी कविता

मला कापले पण तुझ्या डोळ्यात पाणी कसे रे…!!! 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

दोन जीव वेगवेगळे पण काळीज कसे एक झाले…!!! 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

आठवणीची साठवण माझ्या मनी,

तुझ्याच येण्याने खुलते माझ्या गालावरी खळी…!!! 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

माझ्या या भावना मी शब्दांनी का तोलते…??? 

तुझे मुके बोल कळू दे रे मला… 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

]]>
https://www.100poems.in/anniversary-wishes-for-husband-in-marathi/feed 0
+भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य,संदेश आणि स्टेटस | Bhavpurna Shradhanjali in Marathi https://www.100poems.in/bhavpurna-shradhanjali-in-marathi https://www.100poems.in/bhavpurna-shradhanjali-in-marathi#comments Sun, 07 Jan 2024 02:34:09 +0000 https://www.100poems.in/?p=622 Read more

]]>
आपल्या माणसांना दूर जाताना पाहण खरच खूप त्रास देय असत आणि याच बरोबर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देन पण जीवन मरण हे अटळ आणि रोखता न येणार एक सत्य आहे ज्याला आपल्याला कधी ना कधी सामोरे जावेच लागते.

शरीर म्हणजे एक भाड्याच घर आहे ज्याला आपल्याला कधी ना कधी मोकळ तर करवच लागणार आहे. जीवन मरण तर आपल्या हातात नाही पण जागं आपल्या हातात आहे आपण कस जगतोय आणि कस लोकांशी वागतोय हे खूप म्हटवाच आहे. पण हे जरी कितीही खरे असेल तर पण आपण एक माणूस आहोत आपल्याला भावना आहेत. आपण ज्या व्यक्ति बरोबर राहिलो जगलो अश्या व्यक्तींना दूर जाताना पाहणे अत्यंत दुख दयक असतेच म्हणूनच या मनातील भावना शब्दात उतरवण्याचा आम्ही प्रयास आम्ही केला आहे.

आम्ही तुमच्या प्रिय जणांसाठी काही भावपूर्ण श्रद्धांजली कविता, संदेश आणि तसेच शायरी घेऊन आलोय ज्या तुम्ही तुमच्या प्रिय जणाच्या आठवणीत स्टेटस किंवा ग्रुप मध्ये किंवा वरशश्राद्ध मधील पत्रिकेसाठी वापरू शकता तर चला पाहू काही खास अश्या कविता किंवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये .

तुमच्या आयुष्यातील हा कठीण
प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना
की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
मनापासून
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य

श्री …….. यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या
झटक्याने अचानक निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती
देओ व तांच्या कुटुंबास या प्रसंगाचा
सामना करण्याचे सामर्थ्य
देओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना….
…….. जाणे खरोखर मनाला चटका लाऊन गेले.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏

आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या
सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

दुःख निधन
माझे वडील ……यांचे दुःख निधन
झाले आहे.
अंत विधी …….. वाजता आहे.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||🙏

काकांना भावपूर्ण श्रद्धांजली

आमंचे काका श्री …….
यांचे अल्पशा
आजाराने दिनांक रोजी निधन झाले.
ईश्वर
त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏

वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक,
आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि
या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏

आमचे लहान भाऊ ……… यांचे दुःखद निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ💐

देव मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो.
🙏💐Rip.🙏💐

…….. गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी
डोळ्यासमोर आल्या
……. विषयी लिहीणार काय?
अचानक exit मनाला पटली नाही यार
…….
🙏Rest in peace.🙏

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
🙏🌸भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏🌸

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा
जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या
आयुष्याला कोणताच आधार नाही..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..
याचे दु:ख होत आहे.
पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर
लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

आई आजही तुझ्या मायेची उब मला
जाणवते…
कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते….
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा
एकही दिवस जात नाही…
का गेलीस तू मला सोडून आता
मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…
तुझ्या आत्म्यास शांती मिळो.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम
जपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची
काळजी घेणार आहे.
💐बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो.💐

आई आज तू नसलीस तरी तुझी
आठवण येत राहील…
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत
आठवण येत राहील…
आई पुढच्या जन्मीही
तुझ्या पोटीच मला जन्म दे!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती
एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

बाबा तू निघून गेलास अजूनही विश्वास
नाही…
आता तुझ्याशिवाय
जगायचे कसे हेच माहीत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏

अस्वस्थ होतयं मन, अजूनही येतेय
आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏

मायाळू, प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला
वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर
मला अजिबात करमत नाही.
💐भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा.💐

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही आणि ती थांबतही
नाही.. पण हे कोणालाच कसे समजत
नाही की, लाख मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी पूर्ण
होऊ शकत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा !🙏

आम्हा मित्रांना सोडून गेलास,
पण तू कायमचा
आमच्या स्मृतित राहिलास
आठवण येती तुझी आजपण,
राहवत नाही तुझ्याशिवाय.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.🙏

तुझे जाणे मला कायमचे दु:ख
देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच
मला आधार आहे…
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

आई बाबा घरी नसताना
कायम दिला तुम्ही आधार
आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…?
🌸 भावपूर्ण श्रद्धांजली.🌸

तू शिवलेल्या गोधडीची उब आजही
मला जाणवते…
तू प्रत्यक्षात नसली तरी
तुझी माया सोबत आहे…
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली आजी .🙏

तुमची सावली होती म्हणून कधीच
वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी
वाटलेच नव्हते ठायी…
भावपूर्ण श्रद्धांजली.

आपलं ठरलं होत ना आजी / आजोबा…
तुम्ही मला कुठेही सोडून जाणार नाही..
मग आज हा दिवस माझ्या
नशीबी का आला हे मला उमगत नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

आई बाबानंतर सगळ्यात जवळची
व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल
असे वाटलेसुद्धा नाही.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली .

सर्वांना हवेहवेसे वाटणारे
व सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्व
आपल्यातून निघून गेले.
त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

काका म्हणुन सर्वांचे परिचित असलेले मृदु
स्वभावाचे आपल्या ……. चे कर्मचारी यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

भावपूर्ण श्रद्धांजली .
सर्वांचे लाडके काका…
आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व स्व………
यांचे आज निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी
प्रार्थना! तसेच या कठीण समयी
त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख
पेलण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना!🙏

ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,
यहिं तक था सफर अपना…
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐😭

अतिशय कष्टातून
कुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडत
असतांना
अचानक घेतलेली एक्झिट
मनाला चटका लावून गेली…
🙏भावपूर्ण श्रद्धांजली मामा.🙏

व्यर्थ न हो बलिदान
……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्र
शहीद ………..
हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरत
असताना शहिद झाले. ……. तालुक्याचा
लोकप्रतिनिधी
म्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी व
माझे कुटुंब सामील आहे.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

आम्ही तूमच्या पुढे सादर केलेल भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्हाला कसे वाटले जरी तुम्हाला यात काही कमी वाटली तर आम्हाला नक्की कळवा आणि आम्हाला त्या सुधारण्यास मदत करा किंवा तुम्ही आमच्या व्हातसप्प ग्रुप मध्ये जॉइन होऊन पण मदत करू शकता.

तसेच तुम्ही आम्हाला तूमच्या कविता किवा संदेश डायरेक्ट्लि पाठऊ शकता आम्ही त्या आमच्या साइट वर नक्की प्रसारित करू, धन्यवाद..!

]]>
https://www.100poems.in/bhavpurna-shradhanjali-in-marathi/feed 1
त्याग अन् स्त्री जीवन | Womens Life and sacrifices Poem In Marathi https://www.100poems.in/womens-life-and-sacrifices-poem-in-marathi https://www.100poems.in/womens-life-and-sacrifices-poem-in-marathi#respond Sun, 07 Jan 2024 02:30:44 +0000 https://www.100poems.in/?p=391 Read more

]]>

त्याग अन् स्त्री जीवन

त्याग आणी स्त्री जीवन…
जुळते साम्य बरोबरी…
स्त्री जिवनाचा प्रवास सांगतो
पावलो अन् पावले..
त्याग स्त्रीचा..


कधी आई तर कधी बहिण..
कधी मुलगी तर कधी सून…
कधी पत्नी, कधी मैत्रीण….
अनेक रूपे तिची सागतो
त्याग तिच्या आयुष्याची…

प्रत्येक नाती जपतांना..
केलेला त्याग स्वप्नांचा…
कारण नात्यांहून
तिच्यासाठी काही मोठं नसतं….

डोळ्यात स्वप्न, हृदयात प्रेम..
मुखात मधूरवाणी, खांद्यावर जबाबदारी…..

अशी ही त्याग अन् स्त्री जीवनाची समानता…
शब्दात व्यक्त न होणारी…

-ADITYA ZINAGE

]]>
https://www.100poems.in/womens-life-and-sacrifices-poem-in-marathi/feed 0